श्रीगणराजस्वामी समर्थ,...श्रीस्वामी हेच आपले गणपती बाप्पा आहेत.
श्रीगणराजस्वामी समर्थ.
आज देव दिवाळीच्या शुभ दिनी आपण, "श्रीस्वामीराज माऊली" या आपल्या ब्लॉगचा श्रीगणेशा करतोय. कुठल्याही शुभकार्याची सुरुवात आपण श्रीगणपती बाप्पाचे नाव घेवून करतो, तेव्हा आपण त्या कार्याचा श्रीगणेशा केला असे म्हणतो. आपण आपल्या लिखाणाच्या प्रारंभी अगदी वरती,..श्रीगणेशाय नमः असे लिहून सुरुवात करतो. आम्हाला काही लोकं विचारतात, तुम्ही असे वेगळे..."श्रीगणराजस्वामी समर्थ" का लिहिता. तेव्हा त्यांना सांगावे लागते, श्रीगणराजस्वामी म्हणजे दुसरे तिसरे कोणही नसून श्रीगणपती बाप्पा होय. आपले गणपती बाप्पा म्हणजेच श्रीस्वामी समर्थ होय.
हे ऐकून काही श्रीस्वामी भक्तांच्या भुवया उंचावतात. गणपती बाप्पा आणि श्रीस्वामी महाराज एक कसे काय ? खरे तर आपण श्रीस्वामी महाराजांचे कित्येक वर्षा पासूनचे उपासक. मग अद्याप आपल्याला हे समजू नये, हे आश्चर्य कारक आहे. या विषयावर आपल्या यूट्यूब चॅनलचा शुभारंभाचा व्हिडिओ पहावा म्हणजे सर्व स्पष्ट होईल. त्याची लिंक इथे देत आहोत. तरी मी इथे महत्त्वाची एक घटना सांगतो जेणे करून परब्रह्म श्रीस्वामी महाराज आणि गणपती बाप्पा एकच आहेत हे आपल्याला सहज पटेल. ह्या साठी आपल्याला श्रीस्वामी चरित्रातील श्रीस्वामी प्रकट लीलेच्या घटने कडे जावे लागेल. परमेश्वर श्रीस्वामी महाराजांची प्रगत लीला कशी धाडली आणि ती कोणाला उमगली ते आपण आता पाहूया.
मुंबईचा एक महत्त्वाकांक्षी तरुण, हरिबा जेव्हा श्रीस्वामी दर्शनार्थ अक्कलकोटी आला तेव्हा श्रीस्वामी माऊलीनी मोठ्या प्रेमानी त्याला आपल्या मांडीवर घेतले आणि म्हणाले,.. "हरीबा...आता तू आपल्या कामधांद्यावर पाणी सोड आणि माझी ध्वजा उत्तम रित्या उभार. आज पासून तू माझा सुत झाला आहेस बरे." असे म्हणत श्रीस्वामी माउलींनी त्यांना आपल्या आसना खालून एक कफनी कडून दिली. एवढ्यावर श्रीमहाराज थांबले नाहीत तर हरीबाना आज्ञा केली... " मुंबईला जा आणि आपली सर्व संपत्ती, पैसा अडका, सोने नाणे सर्व काही दान कर आणि माझा सुत म्हणून रहा. "
आता काय करावे ! आपण तर श्रीमहाराजांपाशी प्रापंचिक उन्नती साठी आलो आहोत. आणि श्रीमहाराज आपल्याला चक्क सन्यास घेण्यास सांगत आहेत. काय करावे काय नाही. हरिबाला काहीच सुचेनासे झाले. श्रीस्वामी महाराजांची ही आज्ञा ऐकून त्याला रडू कोसळले. तोच एखाद्या रडकुंडीला आलेल्या बाळाची आई चिऊ काऊ दाखवून त्याचे लक्ष्य विचलीत करते अगदी तसेच श्रीस्वामी महाराज हरिबास म्हणाले.., " अरे वेड्या रडतोस काय ! हे बघ माझे पोट किती मोठे आहे. त्यावर हात फिरव पाहू ". हरिबानी नकळत श्रींच्या पोटावरून हात फिरवला तोच त्यांची ब्रम्हानंदी टाळी लागली. हारीबा ट्रान्स मध्ये गेले. कित्येक जन्मा मागच्या एका जन्मात ते गेले.
त्या जन्मी हरिबांचे नाव विजयसिंह होते. वय वर्ष फक्त आठ. मोठा भाऊ आणि वहिनी बरोबर छेलीया नावाच्या खेड्यात एका झोपडीत राहत असत. त्याला एकही मित्र किंव्हा सवंगडी नव्हता. रोज सकाळी न्याहारी झाली की दोन्ही खिश्यात भरपूर गोट्या भरून तो जंगलात जात. तेथे एका भल्या मोठ्या वटवृक्षखाली छोटिशी देवळी होती. त्या देवळीतील श्रीगणपती बाप्पांच्या मूर्ती समोर उभा राहत, आणि त्या बाप्पा बरोबर तो गोट्या खेळत. बाप्पा बरोबर बोलत, हसत, बाप्पा खेळात हरला म्हणून जीभ दाखवून बाप्पाला चिडवत तर कधी बाप्पाच्या सर्व गोट्या जिंकल्या म्हणून आनंदाने नाचत,...उद्या मारीत. कधी तर मोठ्यांनी ओरडत, टाळ्या मारीत.
जंगलात सरपण गोळा करण्यास आलेल्या गावातील लोकांना हा पोरगा काय करतोय, कोणाशी बोलतोय हे समजत नसे. ते त्याला वेडा म्हणत. त्याच्यावर हसत. विजयसिंह मात्र बाप्पा बरोबर खेळण्यात मग्न असत. लोक काय म्हणतात तिथे त्याचे लक्ष्य नसत. तो बाप्पांबरोबर खेळण्यात इतका मग्न होत की त्याला कसलाच भान उरत नसे. कोण काय बोलतोय त्याच्याशी त्याचे काहीच कर्तव्य नव्हते. बाप्पा आणि तो,..एवढेच काय ते विश्व.
तो बाप्पा बरोबर खेळायचा खरा पण नेहमी डाव मात्र स्वतःवर घेवूनच खेळायचा. लहानग्यांचा स्वभावच तसा असतो. आपण तरी लाहापणी कुठे सहजासहजी आऊट होत होतो ? एकदाका बॅटिंग मिळाली की ती आपल्याकडे कायम स्वरुपी असावी असेच आपल्या पण वाटत. अगदी तसेच या पोराला वाटत असावे. म्हणून तो खेळाचा डाव स्वतःकडेच ठेवून नेहमी बाप्पा बरोबर खेळायचा.
पण एके दिवशी विजयसिंह काय मर्जीत होता कोणास ठाऊक ! स्वारी खुशीतच होती म्हणावे लागेल. नेहमी प्रमाणे खिसे भरून तो रानात गेला. बाप्पा समोर उभा राहून त्याच्याशी भरपूर काही बोलला. नंतर देवळी भोवती उड्या मारीत प्रदक्षण्या घालून पुन्हा समोर उभा राहिला आणि बाप्पाला म्हणाला,...."बाप्पा, आज तुझा डाव. चल ये लवकर,.. आपण खेळूया". सर्व गोट्या बाप्पा पुढे उडवून त्यांनी बाप्पाला खेळण्यास चक्क अहावान केले.
आता बाप्पाला येणे भाग होते. भक्त विजयसिंह बोलवत होता. त्याच्या भक्ती पुढे बाप्पाचे काहीच चालणार नव्हते. विजयसिंहला ते माहीत होते. दोन्ही हात कमरेवर घेवून तो बाप्पाची वाट पाहत उभा होता. क्षणाचाही विलंब त्याला आता सहन होत नव्हता. " ये नारे बाप्पा लवकर ये ", असे तो पुन्हा ओरडला आणि लगेच जोर जोरानी वारा वाहू लागला. भयानक वादळ सुरु झाले. मोठमोठाले वृक्ष हलु लागले, त्यांची पाने हावेबरोबर वाहू लागली, अचानक काळोख झाला. माणसे मुंग्यांसारखी आता हवेत उडतील की काय अशी अवस्था झाली. रानात लाकूड तोडायला आलेले गावकरी सैरावैरा पळू लागली. जो तो आपला जीव मुठीत घेवून गावाकडे पळत होता. वाटेत त्यांना विजयसिंह दिसला. त्या लोकांनी त्याला बरोबर गावात चालण्यास खूप सांगितले. "अरे पोरा इथे थांबू नकोस..चाल लवकर. इथे काय होईल आता सांगता येत नाही ", असे त्याला आकांतानी सांगत होते. पण तो बाप्पाच्या आगमनाची वाट अतुरतेने पाहत होता. गावकरी काय बोलत आहेत तेथे त्याचे अजिबात लक्ष्य नव्हते.
अचानक मोठा धरणीकंप सुरू झाला. जंगलातील जनावरं ओरडू लागली. इकडे तिकडे पळू लागली. सर्वतोपरी अकांत झाला. विजयसिंह मात्र तसाच कमरेवर हात घेवून उभा होता. अचानक गगनभेदी आवाज झाला. सगळीकडे वातावरणात धूळ उडाली. विजयसिंह उभा होता, तेथून त्या देवळी पर्यंतची धरणी दुभंगली . त्यातून एक सुंदर आणि मोहक आठ वर्षाची गोरीपान दिगंबर बाल मूर्ती वर आली. मोठ्या आनंदाने उड्या मारीत विजयसिंह हे सर्व पाहत होता. दोघांची आनंदाने गळाभेट झाली आणि बाप्पा गोट्यांच्या खेळाचा डाव स्वतःकडे घेवून खेळू लागला. हा खेळ भलताच रंगला. या खेळात भरपूर देवाण घेवाण झाली. त्या बाबदचा संपूर्ण वृतांत मी पुढे नक्की लिहीन.
तूर्तास आपण पुन्हा हारिबा श्रीस्वामी महाराजांच्या मांडीवर बसलेल्या प्रसंगाकडे येवूया. हरिबाला आता श्रीस्वामींची प्रगतलीला उमगली आणि तो पूर्वाश्रमीचा हरिबा उरला नव्हता. परब्रह्म श्रीस्वामी महाराजांनी त्याला आपला सुत केला होता. तो आता श्रीस्वामीसुत झाला. श्रींच्या मांडी वरून उतरताच तो श्रींची प्रगटलीला अभंगातून गाऊ लागला. " स्वामी अवताराची काय सांगू मात,..मध्य हिंदुस्थानात जन्म त्यांचा.......". तो काय गातोय हे लोकांना कळत नव्हते. पुढे श्रीस्वामी महाराजांनी या अभंगाला दुजोरा दिला तेव्हा लोकांना कळले की हरीबा श्रींची प्रगत लीला गात होता.
भक्त हो,..आपल्या मूळ विषया कडे आता वळूया. श्रीस्वामी समर्थ महाराज हेच आपले गणपती बाप्पा कसे आहेत, असे विचारण्याचा आता प्रश्नच उरत नाही. श्रीस्वामीसुताना श्रींच्या मांडीवर उमगलेला हा प्रसंग पहाता, श्रीस्वामी समर्थ आणि श्रीगणराजस्वामी समर्थ यांचे एक्य सहज आपल्याला समजते. हरिबाने गणपती बाप्पाला खेळण्यास बोलावले असता धरणीकंप झाला. धरणी दुभंगून त्यातून जे आठ वर्षाचे बालक गोट्या खेळण्यास आले ते पुढे कित्येक वर्षानी अक्कलकोटी येवून स्थिरावले. इथे त्यांना श्रीस्वामी समर्थ म्हंटले जात. लहानग्या गणपती बाप्पाचे हे कलियुगातील स्वरूप नाही तर काय.
म्हणूनच आपण श्रीस्वामीभक्त कोणत्याही कार्याचा प्रारंभ,.."श्रीगणराजस्वामी समर्थ" लिहून करतो. समस्त श्रीस्वामी भक्तांनी आता हे समजून घेतले पाहिजे. तर मग आपण आता या ब्लॉगचा शुभारंभ श्रीगणराजस्वामी महणूनाच करूया.
या ब्लॉगवरून आता आम्ही श्रीस्वामी समर्थ महाराजांवर विविध लेख वेळोवेळी प्रकाशित करणार आहोत. नक्की वाचावे अशी सर्वांना विनंती आहे. आमचे हे लेख कसे वाटले ते पण कळवावे श्रीस्वामी समर्थ
https://youtu.be/zZMtVnA5hp
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा