पोस्ट्स

श्रीगणराजस्वामी समर्थ,...श्रीस्वामी हेच आपले गणपती बाप्पा आहेत.

इमेज
   श्रीगणराजस्वामी समर्थ.            आज देव दिवाळीच्या शुभ दिनी आपण, "श्रीस्वामीराज माऊली" या आपल्या ब्लॉगचा श्रीगणेशा करतोय. कुठल्याही शुभकार्याची सुरुवात आपण श्रीगणपती बाप्पाचे नाव घेवून करतो, तेव्हा आपण त्या कार्याचा श्रीगणेशा केला असे म्हणतो. आपण आपल्या लिखाणाच्या प्रारंभी अगदी वरती,..श्रीगणेशाय नमः असे लिहून सुरुवात करतो. आम्हाला काही लोकं विचारतात, तुम्ही असे वेगळे..."श्रीगणराजस्वामी समर्थ" का लिहिता. तेव्हा त्यांना सांगावे लागते, श्रीगणराजस्वामी म्हणजे दुसरे तिसरे कोणही नसून श्रीगणपती बाप्पा होय. आपले गणपती बाप्पा म्हणजेच श्रीस्वामी समर्थ होय.            हे ऐकून काही श्रीस्वामी भक्तांच्या भुवया उंचावतात. गणपती बाप्पा आणि श्रीस्वामी महाराज एक कसे काय ? खरे तर आपण श्रीस्वामी महाराजांचे कित्येक वर्षा पासूनचे उपासक. मग अद्याप  आपल्याला हे समजू नये, हे आश्चर्य कारक आहे. या विषयावर आपल्या यूट्यूब चॅनलचा शुभारंभाचा व्हिडिओ पहावा म्हणजे सर्व स्पष्ट होईल. त्याची लिंक इथे देत आहोत. तरी मी इथे महत्त्वाची एक घटना सांग...